सोने तस्करीप्रकरणी कोरियन नागरिकांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - सोने तस्करीप्रकरणी तीन कोरियन नागरिकांना हवाई गुप्तचर विभाग (एआययूने) बुधवारी अटक केली. युन युसंग, किम चॅंग हो, ली चॅंग हवॉ अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी युनकडून एक कोटी 40 लाख 15 हजार 100 रुपयांचे सोने जप्त केले.

बुधवारी युन युसंग हा हॉंगकॉंगहून छत्रपती शिवाजी विमानतळ, सहारला आला. त्याच्या हालचाली एआययूच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे एआययूच्या अधिकाऱ्यांनी युनला ताब्यात घेतले. त्याने कापडी पट्टा आणि अंतःवर्स्त्रात सोने लपवून आणले होते. युनकडून एआययूच्या अधिकाऱ्यांनी पाच गोल्ड बार जप्त केले. जप्त केलेल्या गोल्ड बारची किंमत एक कोटी 40 लाख 15 हजार 100 रुपये इतकी आहे. युनच्या चौकशीत किम आणि लीचे नाव समोर आले.

Web Title: mumbai news gold smuggling korean people arrested