आता संगीताच्या कार्यक्रमासाठीही जीएसटी लागतो: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची आर्थिक उभारणी करताना सर्व सामान्यांच्या आवाक्यात असणारे कर रचना केली होती. कररचना जाचक नसावी अशी त्यांची धारणा होती. नाही तर आता साधा संगीताचा कार्यक्रम करायला गेलात तरी जीएसटी लागतो

नवी मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते शरद पवार यांनी आज (बुधवार) नवी मुंबईत आंबेडकर स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षास (भाजप) जीएसटीवरून लक्ष्य केले. 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची आर्थिक उभारणी करताना सर्व सामान्यांच्या आवाक्यात असणारे कर रचना केली होती. कररचना जाचक नसावी अशी त्यांची धारणा होती. नाही तर आता साधा संगीताचा कार्यक्रम करायला गेलात तरी जीएसटी लागतो,'' असा टोला पवार यांनी यावेळी बोलताना लगावला. 

Web Title: mumbai news: gst sharad pawar