उपनगरांत फेरीवाला हटाव जोमात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुंबई - बेकायदा फेरीवाल्यांवरील महापालिकेचा कारवाईचा धडाका जोरदार सुरू आहे. वर्षभरात पश्‍चिम उपनगरांतील सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई करून, त्यांच्याकडून आठ कोटींचा दंडही वसूल केला.

पालिकेतर्फे मुंबईतील फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. विशेष मोहीम आखून महापालिका कारवाई करत आहे. फेरीवाल्यांकडील सामान जप्त करून, त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. काही दिवसांनंतर कारवाई थंडावल्यावर बेकायदा फेरीवाले पुन्हा त्याच जागी बस्तान बसवत असल्याचे चित्र आहे. 

वर्षभरात पश्‍चिम उपनगरांतील सहा हजारांहून अधिक फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई करूनही काही दिवसांत त्यांनी पुन्हा आपल्या जागा व्यापल्या आहेत. अशी स्थिती मुंबईतील इतर विभागांतही आहे. त्यामुळे कारवाई करूनही रस्त्यांवर बेकायदा फेरीवाल्यांचे आक्रमण कायम आहे. कारवाईसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी कधी येणार याची माहिती आधीच फेरीवाल्यांना असते. त्याबाबत सर्वच थरातून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

फेरीवाल्यांची काही माणसे सतर्क असल्यानेच कारवाईची गाडी येण्याआधीच सर्व फेरीवाले निसटतात. स्थानिक राजकीय हस्तक्षेपाशिवाय काही अधिकारीच त्याबाबतची माहिती पुरवत असल्याने पालिकेच्या कारवाईचा फारसा परिणाम होत नाही, अशी माहिती काही फेरीवाल्यांनीच दिली. कारवाईनंतर काही दिवसांतच फेरीवाले पुन्हा बस्तान बसवत असल्याने पालिकेची कारवाई फोल ठरत आहे. 

दंड भरून सामान घेण्याऐवजी नवीन खरेदी
कारवाईदरम्यान पालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांचे सामान जप्त करतात. ते ताब्यात घेताना दंडही भरावा लागतो. फेरीवाले त्याचा हिशेब लावतात आणि तो परवडणार नसेल, तर जुन्या सामानाचा ताबा न घेता नवीन सामान खरेदी करून पुन्हा व्यवसाय सुरू करतात. मात्र, ज्या फेरीवाल्यांचे सामान किमती असते, ते दंड भरून त्याचा ताबा घेतात. ताबा न घेण्यात आलेल्या सामानाचा ४० दिवसांनंतर लिलाव केला जातो; ज्यातून महापालिकेला महसूल मिळतो.

Web Title: mumbai news Hawker