मुख्याध्यापकांना उभे राहण्याची शिक्षा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आलेली कार्यशाळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कार्यशाळा संपेपर्यंत बहुतेक मुख्याध्यापकांना उभेच राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी वडाळा येथील खालसा महाविद्यालयात मुंबईतील मुख्याध्यापक, शिक्षकांकरिता अकरावी ऑनलाइन प्रक्रिया समजावण्यासाठी कार्यशाळा घेतली होती; मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. नंतर ही कार्यशाळा माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात घेण्यात आली होती; मात्र तेथे सभागृहाची जागा अपुरी पडली. या कार्यशाळेसाठी 500 जणांना बोलावण्यात आले होते; मात्र सभागृहाची क्षमता केवळ 300 जणांची होती. परिणामी, कित्येक मुख्याध्यापकांना संपूर्ण कार्यशाळेत जणू उभे राहण्याची शिक्षाच मिळाली होती. यासंदर्भात मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी संताप व्यक्त केला. याबाबत शिक्षण उपसंचालक आर. अहिरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

Web Title: mumbai news headmaster punishment