esakal | मुंबईत अंशतः लॉकडाऊन लागण्याची शक्यता, आजचा मुंबईचा कोरोना रिपोर्ट वाचा

बोलून बातमी शोधा

मुंबईत अंशतः लॉकडाऊन लागण्याची शक्यता, आजचा मुंबईचा कोरोना रिपोर्ट वाचा}

मुंबईत आज मृत झालेल्या रुग्णांपैकी  3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांपैकी 3 पुरुष तर 1 महिला रुग्णाचा समावेश होता. मृतांपैकी सर्व रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते.

mumbai
मुंबईत अंशतः लॉकडाऊन लागण्याची शक्यता, आजचा मुंबईचा कोरोना रिपोर्ट वाचा
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 8 : मुंबईत आज 1008 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3 लाख 34 हजार 572 झाली आहे. तर 956 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3 लाख 11 हजार 407 रूग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत आज 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,504 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 225 दिवसांवर आला आहे.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर कोविड रुग्णवाढीचा दर वाढून 0.31 इतका झाला आहे. आतापर्यंतपर्यंत एकूण 34 लाख 34 हजार 610 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

महत्त्वाची बातमी : रात्री थंडी, दिवसा अंगाची लाही लाही; वाढलेल्या उष्णतेबाबत हवामान विभागाचा पुढील अंदाज काय ?

मुंबईत आज मृत झालेल्या रुग्णांपैकी  3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांपैकी 3 पुरुष तर 1 महिला रुग्णाचा समावेश होता. मृतांपैकी सर्व रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते.

मुंबईत 20 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 193 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6078 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 477 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

mumbai news hints of partial lockdown in mumbai read mumbais todays corona report