
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्यात एमएमआर क्षेत्रात ग्रोथ हब तयार करण्याची नीती आयोगाची योजना आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रात ३० लाख घरे उभारावी लागणार आहेत. त्यामध्ये म्हाडासह खासगी विकसकांना प्रमुख भूमिका बजावावी लागेल. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील विकसकांवर राज्य सरकारकडून एसएसआय, प्रीमियमसह वेगवगेळ्या करांच्या माध्यमातून मोठी खैरात होण्याची शक्यता आहे. तसेच तत्काळ परवानग्याही द्याव्या लागणार आहेत.