बेकायदा बांधकामांवर सिडकोची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कोपरखैरणे - वाशी सेक्‍टर 31 मधील दोन बेकायदा बांधकामांवर सिडकोने कारवाई केली. या दोन्ही बांधकामांना नोटिसा पाठवून ती पाडण्याची सूचना केली होती; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिडकोने ही कारवाई केली. 

सिडकोच्या अतिक्रम विरोधी पथकाने बुधवारी वाशी सेक्‍टर 31 येथे केलेल्या कारवाईत दोन इमारती जमीनदोस्त केल्या. भूखंड क्रमांक 463 वर गुणाबाई सुतार यांनी बांधलेली तीन मजली इमारत आणि भूखंड क्रमांक 475 वर इर्शात खान वफा यांनी बांधलेली इमारत सिडकोने पाडली. सिडकोने नोटिसा बजावल्यानंतरही त्यांची कामे सुरूच होती. त्यामुळे सिडकोने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. बेकायदा बांधकाम नियंत्रक सुनील चीडचाले, सहायक अधिकारी विकास खडसे यावेळी उपस्थित होते. 

Web Title: mumbai news illegal construction cidco