शाहरूख खानच्या बंगल्यावर प्राप्तिकर विभागाची टाच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई - अभिनेता शाहरूख खान याच्या अलिबागच्या समुद्रकिनारी असलेल्या "डेजाऊ' या आलिशान बंगल्यावर प्राप्तिकर विभागाने बेनामी संपत्ती व्यवहार कायद्यांतर्गत मंगळवारी (ता. 30) टाच आणली आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे हा बंगला चर्चेत आला होता. 

शाहरूखने पत्नी गौरी खानसह शेतकरी असल्याचे दिशाभूल करून अलिबागमध्ये शेतजमीन खरेदी केली आहे. त्यावर डेजाऊ बंगला बांधला आहे. बेनामी संपत्ती व्यवहार कायद्यांतर्गत प्राप्तिकर विभागाने डिसेंबरमध्ये नोटीस बजावली होती. यानुसार आज कारवाई करण्यात आली असून बंगला सील करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 2006 मध्ये हा बंगला सुमारे चार एकर जागेत बांधण्यात आला होता. यामध्ये तळमजल्यासोबत दोन मजले उभारण्यात आले आहेत. डेजाऊ बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याची तक्रार करण्यात आली होती. या बंगल्यात वैयक्तिक हेलिपॅड आणि स्वीमिंग पूलही आहे. नुकताच शाहरूखने वाढदिवस याच बंगल्यात साजरा केला होता. या बंगल्याची किंमत सुमारे 14 कोटी आहे. 

Web Title: mumbai news Income Tax Department Shah Rukh Khan Bungalow