मुंबई, उपनगरे, ठाण्यासाठी स्वतंत्र सीईओ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबई शहर, उपनगरे आणि ठाणे येथे स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमण्याचे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले. माहीम येथील नेचर पार्कवर कसल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येणार नसल्याचा खुलासाही त्यांनी या वेळी केला. मुंबई विकास आराखडा आणि रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांबाबत शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री वायकर आणि नगरविकासमंत्री रणजित पाटील यांनी उत्तर दिले. या प्रस्तावावर परिषदेतील सदस्य प्रसाद लाड, भाई गिरकर, प्रवीण दरेकर, गोपीकिसन बजोरिया, प्रा. अनिल सोले, रवींद्र फाटक, सुजितसिंह ठाकूर, गिरीशचंद्र व्यास, विद्या चव्हाण यांनी मते मांडली.
Web Title: mumbai news independent ceo ravindra waikar