इंद्राणी मुखर्जीची ईडीकडून सहा तास चौकशी

इंद्राणी मुखर्जीची ईडीकडून सहा तास चौकशी

मुंबई - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) इंद्राणी मुखर्जीची आज भायखळा तुरुंगात चौकशी केली. सहायक संचालकपदाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 6 तास चौकशी केली. तिची पुन्हा 6 डिसेंबरला चौकशी करण्यात येणार आहे.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक मिळाल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4 कोटी 62 लाखांची परदेशी गुंतवणुकीची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी मिळवले, असा आरोप आहे. कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे.

सीबीआयने नोंदवलिेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कार्ती, पीटर, इंद्राणी मुखर्जी व अन्य संबंधितांविरोधात सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंद केला होता. "ईसीआयआर' हा एकाअर्थी "एफआयआर' असून, त्याअंतर्गत या प्रकरणात झालेला गैरव्यवहार व संबंधितांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com