maharashtra Jain monk stages protest against closure of Dadar Kabutarkhana in Mumbai
Sakal
मुंबई
Mumbai Kabutarkhana: दादर कबुतरखानाप्रकरणी जैन मुनींचे आंदोलन १५ दिवस स्थगित!
Protest For Kabutar khana: दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याप्रकरणी जैन मुनी यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून हे आंदोलन १५ दिवस स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सोमवारी (ता. ३) आंदोलनाचा इशारा जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी दिला होता; मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीमुळे आझाद मैदानातील हे आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय विजय यांनी घेतला आहे.

