ज्वेल ऑफ नवी मुंबई अंधारात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर २८ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील विद्युत व्यवस्था बंद असल्याने तेथे अंधार पसरतो. त्यामुळे सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. येथील काही विजेचे दिवे बंद पडले आहे. त्यांची दुरुस्ती केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर २८ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील विद्युत व्यवस्था बंद असल्याने तेथे अंधार पसरतो. त्यामुळे सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. येथील काही विजेचे दिवे बंद पडले आहे. त्यांची दुरुस्ती केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

महापालिकेने शहरात अत्याधुनिक ज्वेल ऑफ नवी मुंबई हे आकर्षक आणि प्रेक्षणीय स्थळ बनवले आहे. शहराच्या अनेक भागांतील नागरिक दररोज त्याला भेट देतात. या ठिकाणी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक आदींची सोय असल्याने परिसरातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर येतात. सध्या पावसाळा सुरू असला तरी या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झालेली नाही. यावरून हे ठिकाणी नागरिकांच्या किती आवडीचे बनले आहे, हे स्पष्ट होते. येथे अडीच किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक बनवला आहे. तरुणाईबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी  येतात. पालिकेने या ठिकाणी आकर्षक विद्युत खांब बसवले आहेत; परंतु काही दिवसांपासून अनेक खांबांबरील विजेचे दिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. जॉगिंग ट्रॅकच्या दुतर्फा उगवलेले गवत आणि शेजारच्या तलावाला नसलेली संरक्षण भिंत हे भीतीचे कारण असल्याचे नागरिक सांगतात. बऱ्याच वेळा या ठिकाणी मद्यपी मद्यपान करत असतात. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ३० विद्युत खांबांची मोडतोड झाली होती. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी यायला भीती वाटते. त्यामुळे पालिकेने येथील विजेच्या दिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 

पावसाळा सुरू असला तरी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे नागरिक मोठ्या प्रमाणावर फिरायला येतात. काही दिवसांपासून येथील विजेचे दिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. पालिकेने ते दुरुस्त करावेत. 
- गंगाधर साहू, नागरिक, नेरूळ

ज्वेल ऑफ नवी मुंबई नागरिकांसाठी रात्री ९ पर्यंत सुरू असते. त्यानंतर तेथील लाईट बंद केले जातात; परंतु विद्युत व्यवस्थेची समस्या असल्यास संबंधित विभागाला कळवून बंद दिवे सुरू केले जातील.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

Web Title: mumbai news Jewel of Navi Mumbai