'प्रभू' के घर देर है.. अंधेर नही- रेल्वे मंत्र्यांचा प्रवाशांना हात

रविंद्र खरात
मंगळवार, 20 जून 2017

रेल्वे स्थानकामध्ये 7 प्लॅटफॉर्म आहेत. एक नंबरवर डिलक्स शौचालय बांधण्यास सुरवात केली असून, निधी अभावी काम रखडलेले आहे. तर कसारा कर्जत दिशेकडील दोन नंबर प्लॅटफॉर्मवर शौचालय बांधले. मात्र, तेही बंद असल्याने प्रवासी वर्गाची तारांबळ उड़त आहे.

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकामधील रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनानी रेल्वे अधिकारी वर्गाची भेट घेऊन मागण्या केल्या. मात्र केवळ शाब्दिक आश्वासनांवर परत यावे लागले. अखेर संघटनाचे सचिव श्याम उबाले यांनी ट्विटरवरुन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्वरित अधिकारी वर्गाला काम करण्याचे आदेश दिले. त्या कामांना सुरुवात झाली. यामुळे "प्रभू के घर देर है ..अंधेर नही" अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेचे कल्याण रेल्वे स्थानक हे महत्वाचे स्थानक आहे. कर्जत कसारा आणि मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या तर बाहेरगावी जाणाऱ्या मेल गाड्यांनी प्रवास प्रति महिना सरासरी 58 लाख लोक प्रवास करतात. रेल्वे स्थानकामधील रेल्वे प्रशासन देत असलेल्या सुविधा तोकडया पड़त असून, ज्या सुविधा देतात त्या तरी नीट द्या, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटना सचिव श्याम उबाले यांनी केली होती 

रेल्वे स्थानकामध्ये 7 प्लॅटफॉर्म आहेत. एक नंबरवर डिलक्स शौचालय बांधण्यास सुरवात केली असून, निधी अभावी काम रखडलेले आहे. तर कसारा कर्जत दिशेकडील दोन नंबर प्लॅटफॉर्मवर शौचालय बांधले. मात्र, तेही बंद असल्याने प्रवासी वर्गाची तारांबळ उड़त आहे. तेथे गरदुल्ले आणि भिकारीचा वावर असल्याने दुर्गंधी पसरली असून शौचालयामधील मलमूत्र सांडपाणी रेल्वे रुळावर येत असल्याने प्रवासी वर्गाला नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे. 

प्लॅटफार्म 6 आणि 7 कर्जत कसारा दिशेने असलेल्या शौचालय ही बंद पडल्याने प्रवासी वर्गाची गैर सोय होत आहे. स्थानकामधील 4, 5, 6, आणि 7 नंबर प्लॅटफॉर्मवर बाहेरगावातून येणाऱ्या जाणाऱ्या मेल गाड्या थांबतात. यावेळी गाड़ीमधील सांडपानी रेल्वे रुळवर पडलेले असते तर त्याच परिसरात अन्न पदार्थ विक्री होते यामुळे प्रवासी वर्गाचे आरोग्य धोक्यात आली असून यावर उपाय योजना करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाले यांनी याबाबत मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांची भेट घेऊन केली होती गोयल यांनी काम करू असे आश्वासन ही दिले होते. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाचा दौराही केला होता, काही कामांना सुरवात झाली, मात्र पुन्हा ती रेंगाळली होती. 

या कालावधीत प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी दैनिक सकाळ बातमीचे कात्रण आणि निवेदन ट्विटरवरुन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पाठविले होते. त्याची दखल घेऊन अधिकारी वर्गाला काम करण्याचे आदेश दिले. कल्याण रेल्वे स्थानकामधील डिलक्स टॉयलेट रखड़ले होते पुन्हा काम सुरू झाले, तर रेल्वे स्थानकामधील स्वच्छता, अन्य कामाना गती आल्याने प्रवासी संघटनानी आनंद व्यक्त केला आहे . 

प्रवाशी संघटनाच्या मागणी नुसार एक एक काम हाती घेतले आहे. डिलिक्स टॉयलेट काम आगामी 2 महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी दिली 

Web Title: mumbai news kalyan railway station Suresh Prabhu takes action