रवी भंडारींची हेबियस कॉर्पसची याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले कमला मिलचे मालक रवी भंडारी यांची हेबियस कॉर्पसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

मुंबई - कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले कमला मिलचे मालक रवी भंडारी यांची हेबियस कॉर्पसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

भंडारी यांनी न्यायालयात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अटकेत असताना हेबियस कॉर्पसची याचिका कशी काय केली जाऊ शकते, असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला. मिलमधील आस्थापनांबरोबरच्या करारामुळे भंडारी यांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने ऍड. शाम दिवाण यांनी केला. मात्र अशाप्रकारे याचिका दाखल होऊ शकत नाही, जामिनासाठी भंडारी यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे भंडारी यांच्या वतीने याचिका मागे घेण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून याबाबत सुनावणी घेण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले.

Web Title: mumbai news kamala mill fire case ravi bhandari petition reject