बाहेर पळताना शर्टने पेट घेतला...

बाहेर पळताना शर्टने पेट घेतला...

मुंबई - परदेशांतून आलेल्या भावंडांबरोबर पार्टी करण्यासाठी ते "वन अबोव्ह'मध्ये गेले होते. आग लागली आणि बाहेर पळालो. बाहेर येण्याचा मार्ग अरुंद असल्याने आम्ही होरपळलो, असे भाटिया रुग्णालयात उपचार घेणारा सिद्धार्थ श्रॉफ सांगत होता.

अमेरिकेतून आलेल्या भावांसह आम्ही पार्टीचा आनंद घेत होतो. सुरक्षारक्षकाने आग लागली आहे असे सांगितले आणि एकच गोंधळ झाला. प्रत्येकाला बाहेर पडायचे होते. बाहेर जाण्याचा मार्ग अरुंद होता. काही जण प्यायलेले होते, त्यांना पळता येत नव्हते. ते लटपटत होते, पडत होते. त्यांच्यावर पाय देऊन लोक जात होते. काही जण पुरुषांच्या स्वच्छतागृहात पळाले; तर काही जणांनी महिला स्वच्छतागृहाचा आसरा घेतला. महिला स्वच्छतागृह कोपऱ्यात आहे. तेथून कोणी बाहेरच पडू शकले नाही, अशी माहिती सिद्धार्थने दिली.

बाहेर पडताना शर्टने पेट घेतला. आग विझवताना हात भाजले, असे सिद्धार्थने सांगितले. तो 20 टक्के भाजला आहे. सिद्धार्थ इमारतीच्या खाली आला. एका गाडीचालकाने त्याला केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रथमोपचार केल्यावर त्याच्या नातेवाइकांनी त्याला भाटिया रुग्णालयात हलविले. सिद्धार्थबरोबर पार्टीसाठी आलेल्या आठ ते नऊ जणांपैकी त्याचे तीन भाऊ अमेरिकेतून आले होते. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी ते थांबले होते. 16 जानेवारीला ते अमेरिकेला जाणार होते.

सिद्धार्थचा भाऊ अत्यवस्थ
सिद्धार्थबरोबर पार्टीसाठी आलेला त्याचा भाऊ अमित शहा 30 ते 32 टक्के भाजला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. याव्यतिरिक्त भाटिया रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी दोघांपैकी एक जण 50 ते 60 टक्के; तर दुसरा दहा टक्के भाजला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com