'करंज' पाणबुडी भारतीय नौदलात'

पीटीआय
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई - स्कॉर्पिन श्रेणीतील स्वदेशी बनावटीची "आयएनएस करंज' ही पाणबुडी आज भारतीय नौदलात सहभागी झाली. अशाप्रकारची ही तिसरी पाणबुडी आहे. या पाणबुडीच्या जलावतरण समारंभास नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्यासह अनेक वरिष्ठ नौदल अधिकारी उपस्थित होते. ऍडमिरल लांबा यांच्या पत्नी रिना यांच्या हस्ते या पाणबुडीचे जलावतरण झाले. "माझगाव डॉक लिमिटेड'मध्ये या पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. आणखी वर्षभर ही पाणबुडी विविध कठोर चाचण्यांना सामोरे जाईल, असे ऍडमिरल लांबा यांनी नमूद केले.
Web Title: mumbai news karanj submarine indian navy

टॅग्स