कर्णाक पूल पाडल्याचा खुलासा करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - सॅंडहर्स्ट रोड येथील ब्रिटिशकालीन कर्णाक पूल कोणत्या कारणासाठी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 27) रेल्वे मंत्रालय आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत. कर्णाक पूल धोकादायक झाल्याने तो लोकलचे प्रवासी आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. यासंबंधीच्या जनहित याचिकेवर न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पूल चांगल्या स्थितीत असून, पूल पाडल्यास नागरिकांना त्रास होऊ शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 20 एप्रिलला होणार आहे.
Web Title: mumbai news karnak bridge high court