केडीएमटी सभापती आपल्या दारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सभापती संजय पावशे २५ ऑगस्टपासून ‘केडीएमटी सभापती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत केडीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधणार आहेत. ते प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सभापती संजय पावशे २५ ऑगस्टपासून ‘केडीएमटी सभापती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत केडीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधणार आहेत. ते प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहनच्या बस कल्याण-डोंबिवली अंतर्गत वाशी, बेलापूर, पनवेल, भिवंडी आदी मार्गावर धावतात. प्रवास करताना अस्वच्छ बस, कर्मचाऱ्यांची वागणूक, गाडी बंद पडून होणारी गैरसोय, वाहतूक कोंडीमुळे होणार विलंब आदी समस्यांमुळे प्रवाशांचे हाल होत असून दुसरीकडे उत्पन्नही घटते आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सभापती पावशे २५ ऑगस्टपासून प्रवासीवर्गाशी संपर्क साधणार आहेत.  सर्वच बसमधून प्रवास करून समस्या जाणून घेणे शक्‍य नसल्याने पावशे यांनी ९५९४९९३११२ हा मोबाईल नंबर जाहीर केला आहे. यात व्हॉट्‌सॲपमधून फोटो आणि व्हिडीओद्वारे तक्रार करता येणार आहे. बस वाहतूक कोंडींत अडकल्यास त्या नंबरवर तक्रार केल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्या मार्गावरील कोंडी दूर केली जाणार आहे. बस खराब झाली आणि दुसरी बस न मिळाल्यास यावर तक्रार करता येणार आहे. 

केडीएमटीच्या उत्पन्नवाढीसाठी नागरिकांत जाणे गरजेचे आहे. यासाठी ‘केडीएमटी सभापती आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या समस्या जाणून घेणार आहे. यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. त्यासोबत काही भागात प्रायोगिक तत्त्वावर ‘हात दाखवा बस थांबवा आणि प्रवास करा’ ही मोहिम हाती घेणार आहे. २५ ऑगस्टपासून गणपती बाप्पाचे आगमन होत असून या दिवशीच या उपक्रमाचा श्रीगणेशा करणार आहे. 
- संजय पावशे, सभापती, केडीएमटी

Web Title: mumbai news kdmt