गोवंशाची कत्तल करणारी सात जणांची टोळी अटकेत 

गोवंशाची कत्तल करणारी सात जणांची टोळी अटकेत 

खालापूर - खालापूर तालुक्‍यात गोवंशाची कत्तल करून मांस नेणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तालुक्‍यातील वावर्ले, तांबाटी आणि भिलवले ठाकूरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत झाली होती. वावर्ले गावाजवळ 26 डिसेंबरला तीन बैल व एका गाईची कत्तल करण्यात आली होती. त्या वेळी बैलांना ब्रेडमधून गुंगीचे औषध देऊन कत्तल करण्यात आली. त्यानंतर खोपोली-पेण रस्त्यावरील तांबाटी येथे 1 जानेवारीला एक गाय व बैलाचे मांस पळविण्यात आले होते, तर 4 जानेवारीला भिलवले येथे बिस्किटांवर गुंगीचे औषध टाकून तीन बैलांना ठार मारण्यात आले होते. 

या प्रकरणी पोलिसांनी तपासासाठी चार पथके तयार केली होती. या पथकाने तळोजा, मुंब्रा आणि कल्याण परिसरातून सात जणांना अटक केली. या टोळीकडून नंबर प्लेट नसलेल्या मोटारीचा वापर केला जात होता, तर कोणाला संशय येऊ नये म्हणून भगवा झेंडा मोटारीत लावण्यात आला होता. या मोटारीत बिस्किटेही सापडली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com