Mumbai News: किशोर बिसुरे जुलैपासून तुरुंगात, सत्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला

Mumbai News:
Mumbai News:sakal

Maharashtra News: जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या डॉ. किशोर बिसुरे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास (ता. ४) नकार दिला. न्या. एम. जी. देशपांडे यांनी बिसुरे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

वरळी येथील एनएससीआय आणि दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीला मिळाले होते.

Mumbai News:
Crime News : पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट ; चौघांना अटक,बेवारस मृतदेह सापडल्याचा उलगडा

कोविड सेंटरवर कार्यरत वैद्यकीय कर्मचारी ५० ते ६० टक्के असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आकडा वाढवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी दहिसर येथील कोरोना केंद्रात प्रभारी म्हणून काम करत असलेल्या डॉ. किशोर बिसुरे यांना ईडीने अटक केली, त्यानंतर बिसुरे जुलैपासून तुरुंगात आहेत.

Mumbai News:
Crime News : पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट ; चौघांना अटक,बेवारस मृतदेह सापडल्याचा उलगडा

कोविड सेंटर दहिसर येथे असताना बनावट हजेरी पट मंजूर करण्यासाठी बिसुरे यांनी किंमती वस्तू स्वीकारल्या असा ठपका ईडीने ठेवला आहे. आपण पालिकेत गेल्या ३० वर्षांपासून डॉक्टर म्हणून काम पाहत असून दहिसर केंद्रावर डिन म्हणून काम केले.

आपल्याला कोविड वॉरियरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. इतकेच काय तर ईडीने सेवा कालावधीच्या पलीकडे आपल्यावर आरोप लावले असून याप्रकरणी जामीन देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र सत्र न्यायालयाचे विशेष न्या. मकरंद देशपांडे यांच्या समोर आज सुनावणी घेण्यात आली तेव्हा न्यायालयाने त्यांचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे.

Mumbai News:
Nashik Crime News : गोळीबार करणाऱ्या टोळीविरोधात ‘मोक्‍का’; मोरख्या दर्शन दोंदेसमवेत 8 आरोपींवर कारवाईचाबडगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com