बिबट्याच्या चाव्याने दुसऱ्या बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबई - बिबट्याच्या चाव्याने दुसऱ्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घडली. यात 19 वर्षांच्या मरोशीपाडा या बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानात 12 बिबटे उरले आहेत.

मानव - बिबट्या संघर्षात वनविभागाने मुंबईजवळ पकडलेल्या बिबट्यांच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी राष्ट्रीय उद्यानातील "बिबट्या बचाव व निवारण केंद्र सुरू केले आहे. 2012 मध्ये मरोशीपाड्यातून 14 वर्षांच्या बिबट्याला वनविभागाने जेरंबद केले होते. त्यामुळे या बिबट्याला मरोशीपाडा नाव देण्यात आले. त्याची रवानगी निवारण केंद्रात करण्यात आली. गेल्या आठवड्यात मरोशीपाडा बिबट्याला पिंजऱ्याजवळच डुलकी लागली. झोपेत असताना त्याची शेपटी शेजारील बिबट्याच्या पिंजऱ्यात गेली. त्या वेळी शेजारील पिंजऱ्यातील अर्जुन नावाच्या बिबट्याने मरोशीपाडाच्या शेपटीला दोनदा चावा घेतला. गंभीर जखम झाल्याने शेपटीतून रक्‍तस्राव झाला. अखेर त्याची शेपटी कापण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. शनिवारी (ता. 21) शस्त्रक्रिया करून शेपटी कापण्यात आली. मात्र, वयोमान अधिक असल्याने त्याचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

Web Title: mumbai news leopard death by leopard bite