एसटी भरती परीक्षेच्या उत्तरांची सूची लवकरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - एसटी महामंडळाने वाहक आणि चालकांची भरती करण्यासाठी रविवारी घेतलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरांची सूची लवकर महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई - एसटी महामंडळाने वाहक आणि चालकांची भरती करण्यासाठी रविवारी घेतलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरांची सूची लवकर महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

एसटीच्या कोकण विभागात 7 हजार 929 चालक आणि वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 27 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेसाठी 28 हजार 314 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 20 हजार 483 उमेदवारांनी परीक्षा दिली. एसटीच्या अन्य पदांसाठीही लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai news list of answers to the st recruitment test soon