प्रलंबित निकाल सहा दिवसांत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुंबई - एलएलबीचा पहिल्या वर्षाचा प्रलंबित निकाल अद्याप जाहीर न झाल्याने संतप्त झालेल्या अमेय मालश या विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी काही विद्यार्थी व पालकांसह मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात उपोषणास सुरवात केली. निकाल तातडीने न लागल्यास प्रसंगी आत्महत्या करण्याचा इशाराही त्याने यापूर्वी दिला होता. त्यामुळे धास्तावलेल्या विद्यापीठ प्रशासनाने सर्व रखडलेले निकाल सहा दिवसांत लावण्याचे आश्‍वासन त्याला दिले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले. 

पनवेलमधील "बीसीटी कॉलेज ऑफ लॉ'मध्ये शिकणारा अमेय एलएलबीच्या पहिल्या वर्षाचा प्रलंबित निकाल अद्याप जाहीर न झाल्याने निराश झाला होता. त्याने सोमवारी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पत्र लिहून उपोषण करण्याचा, प्रसंगी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. निकाल प्रक्रियेतील गोंधळास कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यासह काही अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करतानाच विद्यापीठाच्या कार्यशैलीची लाज वाटते, अशा शब्दांत त्याने संताप व्यक्त केला होता.

Web Title: mumbai news llb result