कागदाच्या कपटावरून मृताची ओळख पटवली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - लोकल अपघातात मृतांची ओळख पटवण्यात अनेक अडचणी येतात, पण कागदाच्या कपटावरून जुळवलेले मोबाईल क्रमांक आणि रेल्वे तिकिटावरून मृत नेपाळीची अंधेरी रेल्वे पोलिसांनी ओळख पटवली.

इतवरिया डंगोरा थारू (वय 47) असे त्याचे नाव आहे. मात्र अंत्यविधीकरिता पैसे नसल्याने रेल्वे पोलिसांनी थारूच्या नातेवाइकांना आर्थिक मदतीचा हात दिला.

थारू हा मूळ नेपाळमधील बडालोत या दुर्गम भागातील रहिवासी होता. वडिलांच्या मृत्यूनंतर वृद्ध आई, पत्नी आणि चार मुलांच्या उदरनिर्वाहाकरिता डिसेंबरमध्ये तो मुंबईत आला होता. 10 दिवस मुंबईत त्याने चिनी खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाडीवर काम केले. नव्या नोकरीकरिता तो रत्नागिरीला जाणार होता. त्यासाठी त्याने एक्‍स्प्रेसचे तिकीटही खरेदी केले; मात्र सांताक्रूझ-विलेपार्लेदरम्यान लोकल अपघातात तो जखमी झाला. अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास गाढवे, सहायक उपनिरीक्षक प्रकाश कुंभार आणि पोलिस नाईक गोवर्धन जाधव यांनी तपास सुरू केला. थारूच्या खिशात रेल्वेचे तिकिट आणि कागदाचा कपटा सापडला. फाटलेल्या त्या कपटाची जुळवाजुळव केली. त्यावर मोबाईल क्रमांक मिळाला.

Web Title: mumbai news local accident death body identification police