लाऊडस्पीकरवाल्यांचा दहीहंडीच्या दिवशी संप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा 75 डेसिबलपेक्षा जास्त ठेवण्यास बंदी असल्याने साऊंड सर्व्हिस व्यावसायिकांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाईची भीती असल्याने त्यांनी दहीहंडीच्या दिवशी (ता. 15) राज्यव्यापी बंद पुकारला आहे.

सार्वजनिक ठिकाणच्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा 75 डेसिबलपेक्षा जास्त असू नये, असा निर्णय न्यायालयाने दिल्याने सभा-समारंभाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावणार कसा? न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सणासुदीला किंवा सभासमारंभाला लाऊडस्पीकर न लावण्याचा निर्णय प्रोफेशनल ऑडिओ लायटिंग असोसिएशनने (पाला) घेतला आहे.

सार्वजनिक सभा-समारंभ, दहीहंडी, गणेशोत्सवाच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा आवाज वाढवण्याचा आग्रह आयोजक करणार आणि आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पोलिस कारवाई करणार, अशा कात्रीत साऊंड सर्व्हिस व्यावसायिक सापडले आहेत. पोलिस कारवाई करताना मारहाण करतात आणि साधनांची मोडतोड करतात. त्यामुळे यंदा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, अशी भूमिका "पाला'ने घेतली आहे.

अडीच लाख व्यावसायिकांचा सहभाग
राज्यातील साधारण पाच लाखांहून अधिक लाऊडस्पीकर व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होणार असल्याने यंदा सणांमध्ये "आवाज' नसेल, असेही "पाला'ने म्हटले आहे. त्याचप्रमाणे आवाजाची मर्यादा मोजण्याचे प्रशिक्षणही न दिल्याने त्याचे नेमके मोजमाप होत नसल्याचा आरोपही "पाला'ने केला आहे.

Web Title: mumbai news loudspeaker strike at dahihandi