प्रा. तोरडमल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 जुलै 2017

मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 1 वाजता जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होती. तत्पूर्वी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात जाऊन तोरडमल यांचे अंत्यदर्शन घेतले.

तोरडमल यांचे रविवारी सायंकाळी वांद्रे येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले होते. सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव यशवंत नाट्यमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अभिनेते मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय गोखले, अतुल परचुरे, सुनील तावडे, पुष्कर श्रोत्री, प्रदीप पटवर्धन, प्रदीप कबरे, दिग्दर्शक राजन पाटील, अभिनेत्री सविता मालपेकर, आशालता वाबगावकर, नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Web Title: mumbai news madhukar toradmal Funeral