मधुकर नेराळे यांना नारायणगावकर पुरस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ तमाशा कलावंत मधुकर नेराळे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा मागील वर्षीच्या पुरस्कारप्राप्त तमाशा कलावंत श्रीमती राधाबाई खोडे-नाशिककर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 9) होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आदी उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर तमाशा ढोलकीफड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: mumbai news maharashtra news madhukar nerale narayangavkar award