माहीम रेल्वेस्थानकावरील पूल खुला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

धारावी - हार्बर मार्गावरील माहीम जंक्‍शन स्थानकावर फलाट क्रमांक पाचजवळ पादचारी पुलाला जोडणारा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे काम पूर्ण होऊनही तो प्रवाशांसाठी खुला केला नव्हता. यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन पूल ओलांडत होते. या सर्व प्रकारामुळे महिला प्रवासी, वरिष्ठ नागरिक, रुग्ण, गर्भवती, लहान मुले यांना त्रास सहन करावा लागत होता. तयार असलेला पूल रेल्वे प्रशासनाने लवकरात खुला करावा, अशी मागणी प्रवासी करीत होते. याबाबत ‘मुंबई टुडे’मध्ये ‘माहीम रेल्वेस्थानकावरील पूल बंद; प्रवासी हैराण’ या मथळ्याखाली सोमवार (ता. ५) बातमी प्रसिद्ध झाली.

धारावी - हार्बर मार्गावरील माहीम जंक्‍शन स्थानकावर फलाट क्रमांक पाचजवळ पादचारी पुलाला जोडणारा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे काम पूर्ण होऊनही तो प्रवाशांसाठी खुला केला नव्हता. यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन पूल ओलांडत होते. या सर्व प्रकारामुळे महिला प्रवासी, वरिष्ठ नागरिक, रुग्ण, गर्भवती, लहान मुले यांना त्रास सहन करावा लागत होता. तयार असलेला पूल रेल्वे प्रशासनाने लवकरात खुला करावा, अशी मागणी प्रवासी करीत होते. याबाबत ‘मुंबई टुडे’मध्ये ‘माहीम रेल्वेस्थानकावरील पूल बंद; प्रवासी हैराण’ या मथळ्याखाली सोमवार (ता. ५) बातमी प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकरिता पूल खुला केला.

Web Title: mumbai news Mahim railway station