मुंबईत माहिममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

corona-mumbai.jpg
corona-mumbai.jpg

मागच्या काही दिवसात मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे. धारावीमध्ये रविवारी आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. माहिममध्ये आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. धारावीत सध्या १२५ अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. दादर भागातून आणखी १९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. माहिम भागात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या वाढून रविवारी २६० झाली. शनिवारी रुग्णसंख्या २३८ होती. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जी/नॉर्थ वॉर्डमधून आज ६६ करोना रुग्णसंख्येची नोंद झाली. धारावी, दादर, माहिमचा भाग असलेल्या जी/नॉर्थ वॉर्डमध्ये ५७९ अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. 

मुंबईत सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. काल मुंबईत १,७०९ करोनाबाधित आढळले होते. आज मुंबईत १,९६२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. शनिवारी मुंबईत वर्षभरातील सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद झाली होती. आज त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मुंबईत आज सात रुग्णांचा मृत्यू झाला. 

मुंबईत आज १२५९ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. पण रुग्ण दुप्पटीचा कालावधी आणखी घटून १७६ दिवस झाला आहे. मुंबईत शनिवारी रुग्ण दुप्पटीचा कालावधी १८६ दिवसांवर होता. ७ मार्च ते १३ मार्च दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर ०.३९ टक्के आहे. मुंबईत अजून १३,९४० अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत तीन लाख ४३ हजार ९४७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ११ हजारपेक्षा जास्त नागरिक कोरोनामुळे प्राणांना मुकले आहेत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com