सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबईः ज्येष्ठ सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ (वय 22) याने नेपिएन्सी रस्त्यावर असलेल्या इमारतीवरून उडू मारून आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडली.

मुंबईः ज्येष्ठ सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ (वय 22) याने नेपिएन्सी रस्त्यावर असलेल्या इमारतीवरून उडू मारून आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मन्मथ (रा. ठी-ब्लू हेवन अपार्टमेंट, मरीन लाइन्स, मुंबई) हा आज सकाळी सातच्या सुमारास त्याचा मित्र अग्रवाल यास भेटण्यासाठी घरातून निघाला होता. नेपिएन्सी रस्त्यावर असलेल्या  दरिया महल या इमारतीवरून एक युवक खाली पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरिक्षक श्री. चौधरी व सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. उडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्याचे डोके फुटलेले आढळून आले होते. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालासाठी त्याचा मृतदेह जे. जे. रुग्णालय येथे नेण्यात आला आहे. या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मन्मथची आई मनीषा म्हैसकर या नगर विकास विभागाचा प्रधान सचिव आहेत तर वडिल मिलिंद म्हैसकर म्हाडाचे उपाध्यक्ष, सीईओ आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: mumbai news Manisha Mhaiskar's son manmath commits suicide