एक मराठा! लाख मराठा! घोषणा देत केला 'हल्ला बोल'

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई: मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर महाराष्ट्रातून आलेल्या शेकडो मराठ्यांनी अखेर मुंबईत धड़क देत अरे एक मराठा ! लाख मराठा!! घोषणा देत "हल्ला बोल" केलाच. पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार देताच मराठ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून सरकार विरोधी मर्मभेदी-गगनभेदी घोषणा दिल्या. या वेळी दुतर्फा बघ्यांची गर्दी होतीच पण खास पोलिस बंदोबस्त ही दिमतीला होताच.

मुंबई: मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर महाराष्ट्रातून आलेल्या शेकडो मराठ्यांनी अखेर मुंबईत धड़क देत अरे एक मराठा ! लाख मराठा!! घोषणा देत "हल्ला बोल" केलाच. पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार देताच मराठ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून सरकार विरोधी मर्मभेदी-गगनभेदी घोषणा दिल्या. या वेळी दुतर्फा बघ्यांची गर्दी होतीच पण खास पोलिस बंदोबस्त ही दिमतीला होताच.

झोन एकचे पोलिस उपायुक्त डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी बलराम भडेकर यांच्याशी चर्चा करीत निवेदन स्विकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर फसवणूक आणि मराठा युवकांच्या ९ जून रोजी मराठा मोर्चा करुन नाशिक येथील तीन मुले मराठा समाजाचे परतीच्या वेळी अपघातात मृत पावले. त्याचे बाबत मुख्यमंत्री यांच्यावर मनुष्यवधचा गुन्हा दाखल व्हावा, कारण त्या दिवशी सकल मराठा समाज हा रस्त्यावर होता आणि आश्वासनाचे गाजर दाखवायची जी भुमिका घेतली सरकारने त्या प्रमाणे त्यांना कसली ही मदत नाही केली म्हणून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

बलराम भडेकर म्हणाले, एकदा जे बोललो त्यावर कठोर आणि ठाम राहणारे फक्त वीर मराठेच आहेत. बाकी सगळे प्रसिद्धीसाठी भुकेले आहेत. अगोदर मुंबई मोर्च्याच्या तारखा रद्द होऊ लागल्या आता तर बैठकाच रद्द व्हायला लागल्यात आणि विशेष म्हणजे आतापर्यंत ज्या काही बैठक झाल्या त्यामध्ये प्रत्यक्ष काय चर्चा आणि निर्णय झाले ते जनतेपर्यंत पोहोचले नाही. परंतु, आपल्या प्रत्येक बैठक आणि आंदोलनाचे live विडिओ शूटिंग द्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचले जात असल्याने आता नेमकं काय घडलंय आणि कोणी घडवलय हे सर्वांच्या लक्षात येत असल्याने आता खऱ्या अर्थाने मराठा नवक्रांती घडत असल्याचे दिसून येत आहे.

निवेदन देणारे प्राचार्य संभाजी पाटील व बलराम भडेकर भारतीय मराठा महासंघ युवा प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र (अहमदनगर), आप्पासाहेब आहेर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय मराठा महासंघ (श्रीरामपूर), प्रा. संभाजी पाटील (हिंगोली), अविनाश पवार (ठाणे), वृषाली शेडगे, राजश्री कदम, सुजाता कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

जर पुढे आश्वासने नाही पाळली तर महाराष्ट्रभर होणाऱ्या उद्रेकाला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असतील आणि ते ज्यांनी मराठा समाजाचे आमदार खासदार म्हणून मिरवतात आणि सेटेलमेंन्ट करतात फक्त त्यांना आम्ही रस्त्यावर फिरु देणार नाही. सर्वांना समोर मुख्यमंत्री महोदय यांनी मराठा आरक्षणाचा जी. आर. वाचून पारीत करावा. मागण्यांची कोणतीही सेटेलमेंन्ट कुणा एकट्या बरोबर कृरु नये. अन्यथा मराठा जाब विचारल्या विना सोडणार नाही, 'एक मराठा लाख मराठा'जा जयघोष करत, असा इशाराही दिला.

Web Title: mumbai news maratha kranti morcha and police