मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

मुंबई - सलग दोन रात्री मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता वाढणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

शुक्रवारपासून रात्रभर कोसळणाऱ्या पावसात विजांचा कडकडाटही दिसून आला. रात्रभर पावसाचे मनसोक्त कोसळणे, विजांचा कडकडाट या लक्षणांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत दिसून येत आहे. शनिवारी नैऋत्य मोसमी वाऱ्यांची पश्‍चिम भागात वाढ दिसून आली. मॉन्सून सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत पोहोचला. येत्या दोन दिवसांत कोकणातील इतर भागांत, मध्य महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे पोहोचतील, अशी आशा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली.

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाचे धुमशान सुरू आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर जास्त दिसून येत आहे. राज्यातही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत असल्याने मॉन्सूनला राज्यातील इतर भागात प्रवेश करण्यास वातावरण पोषक झाले आहे.

शनिवारी झालेली पावसाची नोंद
केंद्रे पाऊस (मि.मी.)

  • मुंबई (कुलाबा) 0.8
  • मुंबई (सांताक्रूझ) 0.1
  • डहाणू 1.0
  • रत्नागिरी 55
  • हरणई 39
  • वेंगुर्ला 24
  • अलिबाग 10
  • औरंगाबाद 3

Web Title: mumbai news marathi news maharashtra news monsoon rain in mumbai