मराठवाड्यातील आमदार आज 'मातोश्री'वर?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - शिवसेना राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाजवळ पोचली असल्याचा दावा या पक्षाच्या काही नेत्यांनी केल्यानंतर मराठवाड्यातील आमदारांची धाकधूक वाढली आहे. मुदतपूर्व निवडणुकीच्या भीतीने सत्तेतून बाहेर पडण्यास मराठवाड्यातून विरोध होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी तेथील आमदारांची "मातोश्री'वर मंगळवारी (ता. 26) बैठक होण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेच्या नेत्यांसह मुंबई, ठाणे आणि कोकणातील बहुसंख्य आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्यास होकार दर्शवला आहे. मंत्रीही सत्तेतून बाहेर पडण्यास अनुकूल आहेत. मात्र, मराठवाड्यातील दहा आमदार या निर्णयाविरोधात असल्याचे समजते. सत्तेतून बाहेर पडल्यास सरकार कोसळून मुदतपूर्व निवडणुका झाल्यास निभाव लागणे अवघड आहे, अशी भीती आमदार व्यक्त करत आहेत. आमदार सुभाष साबणे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील आमदार उद्या "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध होण्याची शक्‍यता आहे.

भाजपपुढेही आव्हान
शिवसेनेचे आमदार फुटल्यास त्यांना पोटनिवडणुकीत जिंकून आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. या पोटनिवडणुका टाळण्यासाठी शिवसेनेचे 20 हून अधिक आमदार भाजपला फोडावे लागतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फोडण्याचे आव्हानही भाजपला पेलावे लागेल.

Web Title: mumbai news marathwada mla go to matoshri