
Mumbai Fire News: मुंबईत माहीम परिसरात मोठी आग लागल्याचं वृत्त आहे. एसीच्या कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाल्यानं ही आग लागली, यामध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यूही झाला आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तसंच आगीत अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं आहे.