अखेर औषध विक्रेते ऑनलाइन "मेडिप्ता' ऍपचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई - ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने अखेरीस स्वत:च ऑनलाइनचा मार्ग स्वीकारला आहे. त्यासाठी एक मोबाईल ऍप सादर केले असून, राज्यभरातील सुमारे 72 हजार औषध विक्रेते त्याबरोबर जोडले जाणार आहेत.

ऍपमुळे रुग्ण, रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांना मोफत सेवा मिळणार आहे. औषधांबरोबरच रुग्णवाहिका, रक्तपुरवठा, डॉक्‍टर, वैद्यकीय अहवालाचे डिजिटायजेशन, रुग्णांना सल्ला आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री, विमा या सेवासुद्धा मिळणार आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले, की पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न आहे. आता अनेक यंत्रणा डिजिटलबरोबर जोडण्यात आल्या आहेत. सरकारने भविष्यात औषध विक्रेत्यांना ऑनलाइन सेवा देण्याच्या सूचना केल्या किंवा तसा कायदा तयार केला, तर विक्रेत्यांसमोर अनेक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे "ऑनलाइन'चा निर्णय घेतला आहे.

Web Title: mumbai news medicine sailer online medipta app