मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मुंबई - रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (ता. 27) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर शनिवारी (ता. 28) मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत राहणार आहे. 

मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाणे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरील लोकल वाहतूक सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 वाजेपर्यंत बंद असेल. या कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसटीकडे येणारी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल. 

हार्बर 
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यानच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 दरम्यान बंद असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. 

पश्‍चिम 
पश्‍चिम रेल्वेवर शनिवारी (ता. 26) मध्यरात्री 12.30 ते रविवारी पहाटे 4 या वेळेत वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी पहाटे चारनंतर या मार्गावरील वाहतूक बंद राहील. 

मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक 
ठाणे स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 दरम्यान पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी शनिवारी (ता. 27) मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12.50 ते सकाळी 6.05 या वेळेत मुलुंड ते कळव्यादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक बंद असेल. शनिवारी रात्री 12.34 ते सकाळी 6.10 या वेळेत डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक मुलुंड ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल, तर अप धीम्या मार्गावरील वाहतूक पहाटे 3.48 ते पहाटे 5.53 दरम्यान दिवा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येईल. ब्लॉकदरम्यान कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. 

Web Title: mumbai news mega block railway