मीरा-भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

मुंबई - मीरा-भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता आणि उपमहापौरपदी चंद्रकांत वैती यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी जाहीर केले. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी बाके वाजवत घोषणांचा गजर केला. सभागृहात भाजप नगरसेवक भगवे फेटे परिधान करून आले होते.

महापालिका निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या वंदना भावसार यांनी "डमी' अर्ज भरला होता. विरोधी पक्षातर्फे कॉंग्रेसचे अनिल सावंत आणि शिवसेनेच्या अनिता पाटील यांनी अर्ज केले होते. महापौरपद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असून, डिंपल मेहता मीरा रोडमधील प्रभाग क्र. 12 मधून निवडून आल्या आहेत. भाजपलाच ही दोन्ही पदे मिळणार, हे स्पष्ट असूनही कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजप नगरसेवकांना रविवारपासून वर्सोवा येथील हॉटेलात ठेवण्यात आले होते.

कॉंग्रेसमध्ये असताना चंद्रकांत वैती यांनी उपमहापौरपद भूषवले होते. प्रेक्षक गॅलरीत जागा नसल्याने आमदार नरेंद्र मेहता, केळकर पत्रकार कक्षात बसले होते. सभागृहात माजी महापौर गीता जैन शेवटच्या रांगेत बसल्या होत्या; तर पहिल्यांदाच विजयी झालेले नगरसेवक पहिल्या बाकावर बसले होते.

Web Title: mumbai news mira-bhayandar mayor dimple mehta