हरित लवादाच्या स्थगितीमुळे मिठीचे रुंदीकरण रखडले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

मुंबई - राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती आदेश दिले असल्याने मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम सध्या करता येत नाही. राज्याच्या मुख्य सचिवांनी हे जून 2016 मध्ये केंद्र सरकारच्या निदर्शनात आणून दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिठी नदी विकास प्राधिकरणाची बैठक घेतली नाही, असा दावा मिठी नदी प्राधिकरणामार्फत करण्यात आला आहे. 

मिठी नदी प्राधिकरणाचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत. त्यांनी 32 महिन्यांत एकही बैठक घेतली नाही, हे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्यानंतर 20 जूनला "सकाळ'ने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली होती. मिठी नदी रुंदीकरणाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे, असा दावा प्राधिकरणाने केला आहे. रुंदीकरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून 10 टक्के काम शिल्लक आहे; मात्र 2013 मध्ये हरित लवादाने या कामाला स्थगिती दिली. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच जून 2016 मध्ये राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी हा प्रकार केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या निदर्शनास आणला आहे, असा दावाही प्राधिकरणाने केला. स्थगिती असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाची बैठक घेतली नाही, असेही सांगण्यात आले.

Web Title: mumbai news mithi river