आमदार साटम पुन्हा वादात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - भाजपचे अंधेरी पश्‍चिम येथील आमदार अमित साटम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील अभियंत्यांना फोनवरून शिवीगाळ करत असल्याचा त्यांचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, इमारत प्रस्ताव विभागातील 50 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार बाहेर काढल्याने हा कट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमदार साटम पालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्याला वारंवार फोन करत होते. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी कनिष्ठ अभियंत्याला फोन करून जाब विचारत शिवीगाळ केली. एका इमारतीच्या बांधकामाचे पैसे देण्यासाठी ते धमकावत असल्याचा दावा या ऑडिओबरोबर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या ऑडिओबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. हा प्रकार गंभीर असल्याचे महापालिका अभियंता संघटनेचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी म्हटले आहे.
Web Title: mumbai news mla amita satam in dispute