सर्वसामान्यांकडे सरकारचे दुर्लक्ष -  विद्या चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

गोरेगाव - सर्वसामान्यांना अन्न, वस्त्र व निवारा आदी मूलभूत गरजांची आवश्‍यकता आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव, घरगुती गॅसवरील सबसिडी हटविण्याच्या हालचाली, भाजीपाला, फळे, डाळ, धान्यांचे वाढते भाव यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांशी केंद्र सरकार व पंतप्रधानांना काहीही सोयरसुतक राहिले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. 

दिंडोशी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, तालुकाध्यक्ष वैभव भरडकर, माजी नगरसेविका रूपाली रावराणे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी पेट्रोलच्या दरवाढीविरोधात निषेध रॅली काढली. सायकलवर बसून सरकारविरोधात घोषणा देत तीन तास दिंडोशीमध्ये रॅली काढण्यात आली. कुरारमधून सुरू झालेली निषेध रॅली, पठाणवाडी मार्गे वीटभट्टीमधून पुढे दिंडोशी सत्र न्यायालयाजवळच्या पेट्रोल पंपापर्यंत आली. पेट्रोल पंपाजवळ थांबून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

अच्छे दिन सर्वसामान्यांचे नाही तर अंबानी व अदानींसारख्या उद्योजकांचे आले. पेट्रोलचे भाव वाढले की वस्तूंच्या किमतीत वाढ होते, हे पंतप्रधानांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत; मात्र बुलेट ट्रेनसाठी सरकार कर्ज घेते. लोकल ट्रेनची स्थिती सुधारा; मग बुलेट ट्रेनचे बघा, असा टोला विद्या चव्हाण यांनी लगावला.

Web Title: mumbai news MLA vidya chavan NCP