बँक एटीएमचा व्यवहार मराठीत केला नाही तर खळखट्याक...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

मराठीत व्यवहार करणे हा आर.बी.आय. चा नियमच असल्याने मराठी बंधनकारक आहे.परंतु सदर नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे .आज स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,युनियन बँक,महेंद्र कोटक,आयसीआयसीआय बँक,नवजीवन आदी सात ते आठ  बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देताना मनसे शहराध्यक्ष संजय घुगे,प्रदिप गोडसे,उपजिल्हाध्यक्ष सचिन कदम,मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, मनसे कामगार युनिट अध्यक्ष तथा दिलीप थोरात,मनवीसे शहराध्यक्ष मनोज शेलार,उपाध्यक्ष कल्पेश माने,मनसे उपाध्यक्ष मैनुद्दीन शेख आदी उपस्थित होते.

उल्हासनगर -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशाने उल्हासनगरातील मनसे,कामगार सेना,व मनविसेने आज बँकांना निवेदन दिले आहे. त्यात शहरातील सर्व बँक व ए.टी.एम. यांचा व्यवहार हा मराठीत व्हायला हवा.अन्यथा खळखट्याक आंदोलन केले जाणार.असा इशारा देण्यात आला असून त्यासाठी 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे.

मराठीत व्यवहार करणे हा आर.बी.आय. चा नियमच असल्याने मराठी बंधनकारक आहे.परंतु सदर नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे .आज स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,युनियन बँक,महेंद्र कोटक,आयसीआयसीआय बँक,नवजीवन आदी सात ते आठ  बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देताना मनसे शहराध्यक्ष संजय घुगे,प्रदिप गोडसे,उपजिल्हाध्यक्ष सचिन कदम,मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, मनसे कामगार युनिट अध्यक्ष तथा दिलीप थोरात,मनवीसे शहराध्यक्ष मनोज शेलार,उपाध्यक्ष कल्पेश माने,मनसे उपाध्यक्ष मैनुद्दीन शेख आदी उपस्थित होते.

दरम्यान उल्हासनगरातील सर्व दुकानांच्या पाट्या देखील मराठीतच असाव्यात अन्यथा काळे फासण्याचा पवित्रा देखील मनसेने घेतला आहे.

Web Title: mumbai news: mns agitation