मनसेच्या संदीप देशपांडेंसह आठ जणांना जामीन नाकारला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठ जणांचा जामीन अर्ज बुधवारी (ता. ६) किल्ला न्यायालयाने नामंजूर केला. आता मनसेतर्फे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात येणार आहे.

आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड अज्ञात व्यक्‍तींनी केली होती. या हल्ल्याची जबाबदारी मनसेने जाहीरपणे घेतली. त्यामुळे पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज तपासून देशपांडे यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींवरील आरोप गंभीर आहेत. जामीन मिळाल्यास पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला होता. याबाबत न्यायालयाने सहमती दर्शवत जामीन फेटाळला. त्यामुळे उद्या (ता. ७) सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याची शक्‍यता आहे. देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरीश सोलंकी, दिवाकर पडवळ आदींचा समावेश आहे.

Web Title: mumbai news MNS sandeep deshpande Bail denied