शालेय वस्तूंऐवजी विद्यार्थ्यांना पैसे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 27 शैक्षणिक वस्तूंऐवजी आगामी शैक्षणिक वर्षापासून रक्कम देण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. या योजनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दोन हजार 300 रुपयांचे अनुदान देणार आहे. हा प्रस्ताव गटनेत्यांपुढे मांडण्यात आला होता. आज झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे.

पालिका शाळेत शिकणाऱ्या तीन लाख 46 हजार 98 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार 300 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेला 82 कोटी 99 लाखांचा खर्च करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचे अनुदान त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा करण्यास विरोध करण्यात आला होता.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा करायचे झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार आहे. त्यासाठी आधार कार्डची आवश्‍यकता आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे एप्रिलपर्यंत आधार कार्ड काढून घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: mumbai news Money for students instead of school items