महावितरण ग्राहकांना 376 कोटी परत करणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - सर्व्हिस लाइन चार्जेस आणि मीटर आकारापोटी ग्राहकांकडून वसूल केलेली 376 कोटींची रक्कम परत करण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. वीज ग्राहकांकडून 20 जानेवारी 2005 ते 30 एप्रिल 2007 या कालावधीत ही रक्कम महावितरणने वसूल केली होती. दीड लाख ग्राहकांना हा परतावा मिळेल. 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ग्राहकांकडून वसूल केलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश गेल्या महिन्यात महावितरणला दिले होते. या आदेशानुसार वीजबिलातून ही रक्कम परत करणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. याविषयीचे परिपत्रक महावितरणच्या संकेतस्थळावर दिसत आहे.

Web Title: mumbai news mseb