जन्मठेप द्या; पण फाशी नको 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - ""मी केलेल्या कृत्याचा मला पश्‍चात्ताप होत आहे. एकवेळ मला 50 वर्षे तुरुंगात ठेवा, आयुष्यभर जन्मठेप द्या; पण फासावर चढवू नका. माझ्या दोन मुलांना वडील जिवंत असल्याची माहिती असावी, एवढीच अपेक्षा आहे,'' अशा शब्दांत मुंबईतील 1993मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांच्या "ब' खटल्यात दोषी ठरलेल्या फिरोझ खानने मंगळवारी विशेष टाडा न्यायालयात विनवणी केली. या खटल्यातील दोषींच्या शिक्षेच्या स्वरूपाबाबतच्या युक्तिवादाला मंगळवारपासून न्यायालयात सुरवात झाली. 

दोषींना कठोरात कठोर, फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. आपल्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते, या कल्पनेनेच फिरोझ गर्भगळीत झाला. त्यामुळे त्याने ही याचना केली. तो म्हणाला, ""माझ्या मुलांना पोरके करू नका. स्फोटांचा कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकींना मी उपस्थित होतो; पण शस्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानाला जाण्यास मी नकार दिला होता. केलेल्या कृत्याचा मला पश्‍चात्ताप होत आहे. आयुष्य तुरुंगात घालवण्याची माझी तयारी आहे. या काळात कधीही फर्लो (संचित रजा) मागणार नाही; पण न्यायालयाने दया दाखवावी.'' 

नौदलातून निवृत्त झालेले वडील आता वयोवृद्ध झाले आहे. त्यांची बायपास शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत. पत्नी दुबईत आहे. मेंहदी लावण्याचे काम ती करते. त्यामुळे माझ्या कुटुंबाला हातभार लावणारे कोणीही नाही. न्यायालयाने या बाबींचा विचार शिक्षा देताना करावा, अशी विनंतीही खान याने केली. 

Web Title: mumbai news mumbai bomb blast