सिनेटच्या निवडणुकांसाठी अधिसूचना जारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार दहा प्राचार्य, सहा व्यवस्थापन प्रतिनिधी, तीन विद्यापीठ अध्यापक आणि विविध अभ्यास मंडळावर प्रत्येकी तीन महाविद्यालयीन विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यासाठी विद्यापीठाने  शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला विविध मतदान केंद्रावर मतदान होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 

या चार अधिकार मंडळाच्या निवडणुकींच्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांना 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे 23 जानेवारीपर्यंत अपील करता येईल. 25 जानेवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 26 जानेवारीला उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. ही यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच www.musenate.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. मतदान केंद्रांची नावेही या संकेतस्थळांवर उपलब्ध असेल, अशी माहिती कुलसचिव (प्र) तसेच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिनेश कांबळे यांनी दिली. 

Web Title: mumbai news mumbai university