फेरीवाल्यांचा पालिकेवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

तुर्भे - नवी मुंबई हॉकर्स फेडरेशनच्या वतीने सोमवारी (ता. ११) पालिका मुख्यालयावर हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला. मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा फेरीवाला संघटनांनी यावेळी दिला. या मोर्चासाठी सकाळपासूनच फेरीवाले पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर जमा झाले होते. त्यानंतर दुपारी ४ पर्यंत पालिकेने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी ठिय्या मांडत निषेध केला. 

शहरातील फेरीवाला समितीच्या मान्यतेने बायोमेट्रिक सर्वेक्षण केले पाहिजे; परंतु पालिका अधिकारी फेरीवाला समितीला विश्‍वासात न घेताच बायोमेट्रिक सर्वेक्षण करत आहेत. त्याला फेरीवाल्यांचा विरोध आहे. सर्वेक्षणात फेरीवाल्यांचा मोबाईल आधारला लिंक केला आहे; पंरतु ७० टक्के फेरीवाल्याचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. ते दोन महिने पुढे ढकलावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. पथविक्री अधिनियम २०१४ च्या अटी शर्तीनुसार सुसज्ज मार्केटची व्यवस्था करून फेरीवाल्यांना ओळखपत्रे द्यावीत. नवी मुंबईतील गावांमध्ये मच्छी विक्रेत्यांचे वडिलोपार्जित धंदे नैसर्गिक बाजारामध्ये ४०-४५ वर्षांपासून सुरू आहेत. त्यांनाही जागा देऊन परवाने आणि ओळखपत्र देण्यात यावे. फेरीवाल्यासाठी मार्केट, वीज, शौचालय अशा सुविधा तयार केल्या जात नाहीत तोपर्यंत परवाने देऊ नये. जुन्या फेरीवाल्यांना पालिकेने सुविधा दिलेल्या नाहीत, असा आरोप फेरीवाल्यांनी केला.

Web Title: mumbai news municipal hawker rally