मालकाच्या १० वर्षांच्या मुलाचा खंडणीसाठी खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

मुंबई -  पवईतील व्यावसायिकाच्या १० वर्षांच्या मुलाचे त्याच्या नोकराने आपल्या साथीदाराच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण करून नंतर त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आज दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

अमर सिंग (२०) आणि लालू सिंग (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. पवई तुंगा परिसरात फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे बबलू सिंग (३७) यांच्याकडे आरोपी अमर सिंग काम करीत होता. त्याने लालू सिंगच्या मदतीने बबलू यांचा मुलगा रितेशचे खंडणीसाठी अपहरण केले आणि अटकेच्या भीतीने भाईंदर येथे गळा दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

मालकाच्या मुलाचे अपहरण केले, तर खंडणी सहज मिळेल, अशी अटकळ बांधून अमर सिंगने रितेशच्या अपहरणाचा कट शिजवला. त्यानुसार रविवारी त्याने रितेशला बोलावले आणि रिक्षात बसवून अंधेरी रेल्वेस्थानक गाठले. भाईंदर येथील लालू सिंगकडे त्याने रितेशला ठेवले. तोपर्यंत रितेशच्या आई-वडिलांनी रितेशचा शोध सुरू केला. त्यांनी अमर सिंगलाही रितेशविषयी विचारले. त्यामुळे तो घाबरला. मुलाला सोडून दिल्यास आपल्याला अटक होईल, या भीतीने त्याने रितेशचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: mumbai news murder crime

टॅग्स