प्रियकराची हत्या करून तरुणीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

अंबरनाथ - तरुणाचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर त्याच्या प्रेयसीवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री अंबरनाथ पश्‍चिमेकडील चिंचपाडा-नाळिंबी रस्त्यावर घडली. 

अंबरनाथ - तरुणाचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर त्याच्या प्रेयसीवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री अंबरनाथ पश्‍चिमेकडील चिंचपाडा-नाळिंबी रस्त्यावर घडली. 

गणेश नावाचा तरुण सोमवारी रात्री चिंचपाडा-नाळिंबी रस्त्यावरील डोंगरावर दुचाकीवर बसून प्रेयसीशी बोलत होता. त्यावेळी तेथे आलेल्या व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून गणेशकडे पैशांची तसेच दुचाकीची मागणी केली. त्यास विरोध केल्याने त्या व्यक्तीने गणेशवर गोळ्या झाडल्या. त्यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून गणेशच्या प्रेयसीवर बलात्कार केला. ती व्यक्ती पळून गेल्यानंतर त्या तरुणीने येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींकडे मदतीची याचना केली. त्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना दिली. ही घटना टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हे प्रकरण तेथे वर्ग करण्यात आले आहे. 

Web Title: mumbai news murder rape case crime