मटण महागणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - पालिकेच्या देवनार पशुवधगृहात आकारल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील मटणाचे दर वाढणार आहेत. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा खिसा मटणाच्या दरवाढीने कापला जाणार आहे. निर्यात शुल्क तिपटीने वाढवण्याचे प्रस्तावित केले असल्याने परदेशात पाठवले जाणारे मांसही महागणार आहे. तसा शुल्कवाढीचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर झाला आहे. 

ताजे आणि सकस मांस मुंबईकरांना पुरविण्यासाठी देवनार पशुवधगृह पालिकेने बांधले आहे. येथील लायसन्स ट्रान्स्फर, प्राण्याचे प्रवेश शुल्क, वध शुल्क, गोठ्याचे भाडे तसेच मांस वाहून नेण्यासाठी परिवहन शुल्क, निर्यात शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. 2009 पासून या शुल्कात वाढ करण्यात आली नव्हती. गेल्या काही वर्षांत महागाई वाढली आहे. पशुवधगृहातील विविध सामग्री, पाणी, विजेवरील खर्च वाढत चालला आहे. पशुवधगृहातील खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसवणे प्रशासनाला अशक्‍य बनले आहे. यामुळेच विविध शुल्कांमध्ये 25 ते 200 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे. या दरवाढीमुळे पालिकेला 2 कोटी 90 लाख 28 हजार रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

सुविधा वाढवल्याने दरवाढ अटळ 
पालिका प्रशासनाने 2014 मध्ये दरवाढ प्रस्तावित केली होती; मात्र पशुवधगृहात सुविधा नसल्यामुळे दरवाढ कशी करता येईल, असा प्रश्न उपस्थित करत स्थायी समिती सदस्यांनी प्रस्ताव फेटाळला होता. पशुवधगृहात गेल्या दोन वर्षांत सुधारणा केल्या असल्याने पुन्हा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीत या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पालिका महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी जाईल. महासभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही दरवाढ लागू करण्यात येईल.

Web Title: mumbai news Mutton expensive

टॅग्स